छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटावरील लाट का व कशी आली?

 


गेल्या एक दीड वर्षाच्या काळात म्हणजे साधारण कोव्हिड नंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट येण्याच प्रमाण अचानक वाढलेलं दिसतं. महाराजांच्या जीवनावर महाराजांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटनांवर त्यांच्या शिलेदारांवर अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात मराठी चित्रपट का येत असावेत असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल.

महाराजांवर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं आपल्या सगळ्यांच प्रेम आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेतच, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर महाराजांचे चित्रपट यायला आपल महाराजांवरच प्रेम कारणीभूत नाही, म्हणजे तसं आहे पण या पेक्षा महाराजांचे चित्रपट येण्याला त्या मागचअर्थकारण जास्त जबाबदार आहे.

मराठी प्रेक्षक मराठी चित्रपट पाहायला सिनेमागृहात येत नाही ही समस्या तर आता सर्वांनाच माहित आहे. ओटीटी मुळे इंटरनेट मुळे ही संख्या दिवसेंदिवस अजूनच कमी होत चालली आहे. अशा मध्ये चित्रपट ज्या गोष्टींमुळे थिएटर मध्ये बघायला प्रेक्षक येतील अशी कुठलीच गोष्ट म्हणजे चित्रपटात काम करणारे स्टार चित्रपटाचे गाणे चित्रपटाचे कथानक हे प्रेक्षकांना सिनेमागृहात आणायला भाग पाडू शकत नाही. ही गोष्ट कोविड नंतर चित्रपट निर्मात्यांच्या आणि दिग्दर्शकांच्या लक्षात आली. साधारण अडीच ते चार कोटींच्या घरात बनणारे मराठी चित्रपट सिनेमागृहात किमान काही लाखांचा टप्पाही पार पाडू शकत नाही. ही बाब चित्रपट बनविणाऱ्यांच्या आणि निर्मात्यांच्या लक्षात आली.

अशा वेळेस प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणेल अशी एकच गोष्ट असं एकच हुकमी नाव. असा एकच खरा सुपरस्टार आहे हे निर्मात्यांच्या लक्षात आले. गेली 400 वर्षे मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एकमेव लोकनेता छत्रपतीशिवाजी महाराज यांच्या जीवनावरचा चित्रपट आजही सिनेमागृहात चालू शकतो हे निर्मात्यांच्या लक्षात आले.

केवळ तीन-साडेतीन कोटींमध्ये बनवलेल्या फर्जंद ने जवळपास 15 कोटीच्या वर 2014 साली व्यवसाय केला होता. हे निर्मात्यांच्या लक्षात आले. आणि महाराजांवर केलेले चित्रपट म्हणजे बॉक्स ऑफिसवर यश हे समीकरण हे पक्के झाले. हे समीकरण पक्क होण्यासाठी त्याला अजून एक महत्त्वाचा कारण होतं ते 2014 साली प्रदर्शित झालेला फर्जंद हा AA फिल्म म्हणजे अनिल थडानी या हिंदीमध्ये अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वितरकाने प्रदर्शित केला होता. बाहुबली, केजीएफ सारखे सिनेमे वितरित करणारी संस्था. AA फिल्म ही जेव्हा फर्जंद सारख्या चित्रपटाच्या मागे विश्वासाने उभे राहते तेव्हा हे समजून घ्यायला हवं की इतर वितरकांना चित्रपटाच्या विजयाबद्दल आणि अशाबद्दल एक खात्री निर्माण झालेली असते. कोविड नंतर अगदी हेच झाले.

महाराजांवरचा चित्रपट म्हणजे तो चालणारच. बनविण्याचा खर्च साधारण तीन ते चार कोटी, प्रमोशनचा खर्च साधारण येथे सव्वा कोटी आणि चित्रपटाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन साधारण वीस कोटीच्या घरात हे समीकरण हळूहळू सर्वच इंडस्ट्रीच्या लक्षात आलं, आणि महाराजांच्या संबंधित चित्रपटाची लाट तयार झाली असे म्हणायला हरकत नाही.

या वाहत्या गंगेत आता सर्व तारके तारका सर्व निर्माते सर्व प्रोडक्शन हाऊसेस सर्व वितरक हात धुवून घेत आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे कस ए ना,महाराजांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेत्यांना जगवलं तर आता निर्मात्यांना ही जगवल कलाकारांची करिअरही घडवली तर त्यात नवल ते काय?

लेखन: असीम त्रिभुवन 

Aseem Tribhhvan

लेखन मिलेनिअल मराठी साठी..

विडिओ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा … 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.